Contact for Advertisement 9650503773


महाराष्ट्र: न्हावरा–तळेगाव ढमढेरे रस्त्याच्या निकृष्ट कामावर ग्रामस्थांचा संताप, आंदोलनाचा इशारा

- Photo by : social media

महाराष्ट्र  Published by: Shivaji Sonaba Shivale , Date: 27/03/2026 11:00:32 am Share:
  • महाराष्ट्र
  • Published by: Shivaji Sonaba Shivale ,
  • Date:
  • 27/03/2026 11:00:32 am
Share:

संक्षेप

महाराष्ट्र: न्हावरा ते तळेगाव ढमढेरे रस्त्याचे कामाकडे शासनाचे दुर्लक्ष तळेगाव ढमढेरे नाव्हरा रोडचे काम चालू आहे त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर यांचे कामावर लक्ष नाही आणि काम चांगले झाले नाही,  रोडच्या दोन्ही साईडने ड्रेनेज लाईनचे काम

विस्तार

महाराष्ट्र: न्हावरा ते तळेगाव ढमढेरे रस्त्याचे कामाकडे शासनाचे दुर्लक्ष तळेगाव ढमढेरे नाव्हरा रोडचे काम चालू आहे त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर यांचे कामावर लक्ष नाही आणि काम चांगले झाले नाही,  रोडच्या दोन्ही साईडने ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे ते काम एवढे हलक्या दर्जाचे झाले आहे , तरी त्यावरून फोर व्हीलर गेली तरी ते तुटत  आहे व गाड्या पलटी होऊन नुकसान होत आहे तळेगाव ढमढेरे येथे एक मोठा चाललेला ट्रक त्यावरून गेला असता ड्रेनेज लाईन तुटून त्यावर वरती गाडी पलटी झाली म्हणजेच कामा चांगल्या दर्जाचे  झाले नाही याच्यावरूनच  कॉन्ट्रॅक्ट कडून या कामावरती चांगल्या  दर्जाचे मटेरियल वापरलेली नाही यावरती पीडब्ल्यूडी चे वरिष्ठ अधिकारी यांनी बारकाईने लक्ष घालून हे काम थांबावंव कामाची क्वालिटी चेक करावी कामाची क्वालिटी चेक नाही केली तर जनसामान्य लोकांचा जो त्रास वाढत आहे तो अतिशय घातक आहे आणि लोक वेळ आली तर रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे।