-
☰
No image found.
महाराष्ट्र: "पत्रकार व समाजकल्याणासाठी संघटित व्हा; लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मेळाव्यात देवाभाऊ कदम यांचे आवाहन"
- Photo by : social media
संक्षेप
महाराष्ट्र: पत्रकारांसोबत समाजातील माणसांवरील अन्यायाविरूध्द आवाज उठवण्यासाठी आणि शासकीय योजनांमधून पत्रकार आणि समाजाचे कल्याण साधण्यासाठी उच्च ध्येयाने प्रेरित झालेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघासोबत सर्व पत्रकार आणि
विस्तार
महाराष्ट्र: पत्रकारांसोबत समाजातील माणसांवरील अन्यायाविरूध्द आवाज उठवण्यासाठी आणि शासकीय योजनांमधून पत्रकार आणि समाजाचे कल्याण साधण्यासाठी उच्च ध्येयाने प्रेरित झालेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघासोबत सर्व पत्रकार आणि समाजबांधवांनी आपली एकोप्याची ताकद उभी करावी.अध्यक्ष संजय देशमुख यांनी पोटतिडकीने मांडलेल्या संकल्पना आणि अपेक्षांना संघटीत शक्तीचे पाठबळ देण्यासाठी ईश्वरीय कर्मपूजा म्हणून त्यांचे सोबत संघटीत व्हावे.असे आवाहन स्थानिक लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष व डॉकयार्ड नेव्हल को.ऑप बॕंकेचे माजी संचालक देवाभाऊ कदम यांनी केले.या चळवळीत त्यांनी आम्हालाही आवाज द्यावा आमची सुध्दा मुंबई आणि महाराष्ट्रातील संघटीत शक्ती त्यांचे पाठीमागे निश्चितच उभी करू असे आश्वासन त्यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून दिले। अध्यक्ष संजय देशमुख यांनी "मी आणि माझे" एवढाच विचार न जोपासता सामाजिक कर्तव्य लक्षात घेऊन पत्रकार आणि आम्हाला जगवणाऱ्या समाजातील लोकांच्या कल्याणासाठी संघटीत होऊन पुढे आले पाहिजे. संघटनेला पत्रकार आणि समाजहितांच्या मागण्यांमध्ये मिळत असलेल्या सध्याच्या यशाचा आलेख अधिक उंचावण्यासाठी महाराष्ट्रभर संघटनेची ताकद वाढवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आपल्या प्रास्ताविक मनोगतातून केले.उपक्रम आणि यशाची माहिती दिली। याप्रसंगी लोकस्वातंत्र्य कोकण प्रभारी जगदिशप्रसाद करोतिया (बोईसर)महाराष्ट्र संघटनप्रमुख रफिक मुलानी, संघटनप्रमुख विनोद चाळके,मुंबई महिला आघाडी प्रमुख सुषमा ढोले-ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाला देवेन्द्र मेश्राम,अदालत भगत, जयप्रकाश जयस्वाल (बोईसर)शरदराव तेलंग (मलकापूर) प्रा.विष्णू मोरे (पूणे) व सातापा दळवी,कमलेश कुबल,विकास भोसले,भरत सकपाळ,सुजय सावंत,जबीना शेख,समिर म्हाब्दी,अजय शिगवण,आसिफ जाफर खान,प्रशांत सावंत,मंगल शिंदे,सुहास मोरे व मुंबईतील अनेक पत्रकार सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सुषमा ढोले- ठाकूर यांनी तर आभारप्रदर्शन विनोद चाळके यांनी केले।
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा कोकण व मुंबई विभागाचा १४ वा विचारमंथन मेळावा,मार्गदर्शन तथा सन्मान समारंभ मुंबईतील दादर (प.) येथील विदर्भ वैभव मंदिर येथे नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवक देवाभाऊ कदम तर म्हणून तर शिवसेना,शिंदे गटाचे गोवा राज्य विधान सभा संपर्क प्रमुख संतोष बामणे,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,राष्ट्रीय पदाधिकारी कादंबरीकार पुष्पराज गावंडे,विदर्भ वैभव मंदिर व बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस गजाननभाऊ नागे,लोकस्वातंत्र्यचे महाराष्ट्र संघटन प्रमुख अरविंदराव देशमुख यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष व अतिथींचे शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.पत्रकार महासंघात नव्याने दाखल झालेल्या २० पैकी १५ सभासदांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा व महापुरूषांना वंदन अभिवादन करण्यात आले. देशातील विविध घटनांमधील बळींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली।
राजस्थान: मोहर्रम की 7वीं तारीख पर अन्दरकोटियान पंचायत का अलम जुलूस अकीदत से सम्पन्न
बिहार: मोहम्मद एजाज अहमद उर्फ मुन्ना जी ने मोहर्रम लाइसेंस किया सरेंडर, निजी कारणों का दिया हवाला
उत्तर प्रदेश: विधायक तूफानी सरोज ने करियांव में सुनी जनसमस्याएं, समाधान का दिया आश्वासन
बिहार: बाजार में प्रशासन का बड़ा एक्शन, वर्षों पुराना अतिक्रमण हटाया गया
उत्तर प्रदेश: विधायक तूफानी सरोज ने करियांव में की जनसुनवाई, ग्रामीणों की समस्याएं सुनीं
