-
☰
No image found.
महाराष्ट्र: PMPML बस में ओवरलोडिंग का आरोप, यात्रियों ने जताई सुरक्षा को लेकर चिंता
- Photo by : social media
संक्षेप
महाराष्ट्र: PMPML पुणे महानगर पालिकेच्या बस प्रवास अतिशय धोकादायक आहे.बस नंबर १५९ तळेगांव ढमढेरे ते म न पा हि बस प्रवाशांना धोकादायक आहे.जिव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.या बस वरती डेपो मॅनेजर व इतर सर्व अधिकारी
विस्तार
महाराष्ट्र: PMPML पुणे महानगर पालिकेच्या बस प्रवास अतिशय धोकादायक आहे.बस नंबर १५९ तळेगांव ढमढेरे ते म न पा हि बस प्रवाशांना धोकादायक आहे.जिव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.या बस वरती डेपो मॅनेजर व इतर सर्व अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे.हि बस सरकारी आहे म्हणून बसमध्ये किती प्रवासी भरावे याचे भान अधिकारी लोकांना राहिलेले नाही.५० शिट वाहतुक परवाना असतानाही बसमध्ये ७० ते ८० प्रवासी दबून भरले जातात.आणि बसचे चालक व वाहक यांनी दरवाजामध्ये ऊभे राहिलेले प्रवाशांच्या जिवांचा विचार केला पाहिजे.प्रवासी दरवाजाच्या आत व्यवस्थित आहे की नाही हे पाहून बस सुरू केली पाहिजे.परंतु चालक व वाहक यांच्या पेक्षा वरीष्ठ अधिकारी यांचे लक्ष प्रवाशांवर पाहिजे.बसमध्ये जास्त प्रमाणात प्रवासी भरल्यामुळे प्रवाशांना ४०ते४५ किलोमीटर अंतर उभे राहून प्रवास करावा लागतो.त्यामध्ये महिला व लहान मुले वयोवृद्ध अपंग व्यक्ती असतात. गर्दी असल्यामुळे प्रवाशांमध्ये वादावादी होतात महिलावर्ग जास्त संतापतात त्यामध्ये कामगार वर्ग इतर जाणाऱ्या व्यक्ती असतात. त्या कामाने दिवसभर दमलेल्या असतात. त्याही वैतागतात आणि एकमेकांचे वादावादी जास्त प्रमाणात होते त्यामुळे याचा विचार करून महानगरपालिकेच्य डेपो मॅनेजर यांनी विचार करून सर्व प्रवाशांना सुलभ प्रवास कसा करता येईल याचा गांभीर्याने विचार करून बस व्यवस्थित मेंटेन चालेल असे नियोजन करावे.दसरी बाजू अशी आहे की पुणे अहिल्या नगर रोड पूर्ण ट्राफिकने जाम असतो.म.न.पा.ते शिक्रापूर खुप ट्राफिक असते.त्यामुळे प्रवासी काम करून थकत नाही तेवढा प्रवास करून खुप थकत आहे.बसमध्ये नियमबाह्य प्रवासी भरू नये .आर टी ओ अधिकारी प्राइवेट बसच्या चेकिंग करतात तसे सरकारी बसच्याही चेकिंग त्यांनी केल्या पाहिजेत बसमध्ये प्रवासी नियमात भरल्यास प्रवाशांचे हाल होणार नाही।
